Weather Update : उन्हासह राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; आजचे हवामान कसे राहील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाळा ऋतू सुरू असून अवकाळी पाऊस पाठ सोडायला मागत नाही. आतापर्यंत या २०२३ या वर्षातच अधिकाधिक अवकाळी पावसाने हजेरी लावली असल्याचे म्हटलं जातंय. अशातच आज (ता.२०) या दिवशी राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (Weather Update) वर्तवली आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

यवतमाळ, गोंदिया, वर्धा, ब्रह्मपुरी येथे ४३ अंशाच्यावर तापमान गेलं आहे. तसेच विदर्भातील वाशीम, अकोला, अमरावती येथे तापमान ४२ अंशा पार गेलं आहे. तर आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस आणि विजांचा कडकडाट असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

आपल्या गावातील हवामान जाणून घेण्यासाठी हे करा

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या गावातील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आजच Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. त्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप सर्च करून इंस्टॉल करा. त्यानंतर या ॲपमध्ये आपल्या गावातील हवामान, आद्रता किती प्रमाणत आहे. याबाबत माहिती एका क्लिकवर मिळू शकते. तसेच हवामान अंदाज, शेतकरी दुकान, सातबारा उतारा, जमीन मोजणी, नकाशा मोजणीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळू शकते.

वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, या भागात येलो अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्र : जळगाव, नगर.
मराठवाडा : जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर
विदर्भ : अमरावती,बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा भंडारा,नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या भागात हवामान खात्याने आज येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केले आहे.

error: Content is protected !!