मुंबई । (Weather Update) राज्यात मागील 3 दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे. अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण बनले आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान बनले असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथे पावसाच्या हलक्या सारी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान बनले असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. 27 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली होती. तसेच 26 जानेवारी नंतर औरंगाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांत काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. आता पुढील दोन दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Weather Update
आता शेतकऱ्यांना मिळणार स्वतःच्या गावातील पुढील 3 दिवसांचा हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा आपल्याला नुकसानाला सामोरे जावे लागते. मात्र आता शेतकऱ्यांना स्वतःच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज मिळणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करायचे आहे. यामध्ये हवामान अंदाजासोबत तुम्ही राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील बाजारभाव स्वतः चेक करू शकता. तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्रे डाउनलोड करता येतात. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही करता येते. आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून या सेवेचे लाभार्थी बना.
दरम्यान, राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. खास करून मराठवाडा, उ महाराष्ट्रात ढगाळ वातावरण बनले आहे. तसेच किमान तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 27 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथे राज्यातील सर्वात नीचांकी 11 डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाले आहे. तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 33.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा अंदाज; ऊस, हरभरा, तूर, भुईमूग पिकांची काळजी कशी घ्यावी?
मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागामध्ये जालना व बीड जिल्हयात दिनांक 29 जानेवारी रोजी तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्हयात दिनांक 27 व 28 जानेवारी दरम्यान तूरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 29 जानेवारी रोजी गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.