Weather Update : पुढील 5 तासांत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत होणार मुसळधार पाऊस; IMD ने दिला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) : दोन महिन्यांहून अधिक दिवस झाले तरीही अजूनही राज्यात अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाही. काल (ता.५) मे या दिवशी धाराशिव, नाशिक, नांदेड या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. आज (ता.६) मे या दिवशी राज्यातील कोंकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. तसेच पुणे, अहमदनगर, बीड, नाशिक आणि मराठवाड्यातील काही भागातही दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

तुमच्या गावात पाऊस पडणार का हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, जत तसेच धाराशिव, पंढरपूर, लातूर आणि कोकण भागात ता. ६,७,८ पर्यंत हवामानात बदल पहायला मिळणार असून अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ९ मे ते १६ मे पर्यंत राज्यात हवामान कोरडे राहणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र पुन्हा एकदा १७,१८,१९ मे पर्यंत हवामानात बदल दिसणार असून या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपीटीचा पाऊस होणार आहे. (Panjabrao Dakh havaman Andaj)

आज ६ मे रोजी दुपारी 3.15 वाजता उपग्रहातून टिपलेल्या छायाचित्रावरून दक्षिण भारत, महाराष्ट्र, मध्यभारताच्या काही भागांवर ढगाळ वातावरण असल्याचे दिसत आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, बीड, नाशिक आणि मराठवाड्यातील काही भागाचा समावेश आहे. यासोबत कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यांत सुद्धा मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तुमच्या गावातसुद्ध वादळी पाऊस पडणार का?

राज्यात सध्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. यामुळे अशा स्थितीत आपल्या गावात किंवा तालुक्यात कधी पाऊस पडेल हे सांगणे अवघड आहे. मात्र, चिंता करण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या गावात पाऊस पडणार असेल तर अगोदरच त्याची कल्पना मिळणार आहे. यासाठी तुम्हाला एक छोटेसे काम करावे लागेल. तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. इथे तुम्हाला तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज समजतो. तसेच आपला सातबारा उतारा डाउनलोड करणे, सरकारी योजनांना अर्ज करणे, जमीन मोजणे, रोजचे बाजारभाव तपासणे आदी सेवा मोफत मिळवतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप डाउनलोड करून लाभार्थी बना. (Weather Update)

आज या भागात येलो अलर्ट जारी :

मध्य महाराष्ट्र, : नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.
मराठवाडा : धाराशिव, लातूर.
विदर्भ : वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केले आहे.

error: Content is protected !!