हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । गेली दोन दिवस म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात राज्यात अवकाळी पाऊसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. काल राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच अहमदनगर, नाशिक, बीड येथे गारपिट झाली. आजही राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील काही भाग, मध्य महाराष्ट्र दुपारपासून काही भागात काही प्रमाणात वादळी पावसाची उपस्थिती पहायला मिळते. या अवकाळी पावसामुळे विदर्भात पातूर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे लिंबू, कांदा, खरबूज या पिकांचे नुकसान झाले. यासाठी दररोजच्या हवामानातील बदलाचे अंदाज जाणून घेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांनी शेतीसाठी हे तपमान किती पोषक आहे. हे जाणून घ्यायचे असेल तर रोजच्या हवामानाबद्दल अपडेट मिळवण्यासाठी ॲपद्वारे माहिती मिळवू शकता.
तुमच्या गावात पाऊस पडणार काय?
शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड केल्यांनतर इथे शेतकऱ्यांना पुढील पाच दिवसांचा स्वताच्या गावातील हवामानाच्या अंदाजाची माहिती देण्यात येते. आपल्या गावातील अचूक हवामान अंदाज समजून घेऊन त्यावर आवश्यक खबरदारी काय घ्यावी, कोणत्या पिकावर काय औषध फवारणी करावी याची माहितीसुद्धा हॅलो कृषी अँपवर देण्यात येते. तेव्हा आजच गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सेवेचे लाभार्थी बाणा.
मोबाईल ॲपद्वारे असे मिळवा हवामानाचे लेटेस्ट अपडेट
शेतकरी मित्रांनो जर आपण अजूनही हॅलो कृषी हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे नाव सर्च करा. आपल्याला हिरव्या रंगाचे ॲप पहायला मिळेल. ते इंस्टॉल करा. त्यानंतर त्यावर आपला मोबाईल क्रमांक, नाव आणि माहिती टाकून निःशुल्क रजिस्ट्रेशन करून रोजच्या हवामानाबद्दलची अपडेट मिळवा.
राज्यातील तापमानात दररोज चढ – उतार होतो. काही वेळा याचाच परिणाम पिकांच्या दरावर पहायला मिळतो. काल (ता.७) या दिवशी ४० अंशापर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ३५ ते ४० अंश सेल्सिअस तापमान हे काल कोकण विभाग वगळता राज्यातील इतर भागात पहायला मिळत होते.
अवकाळी पावसाचं नेमकं कारण काय?
उत्तर मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाडा तसेच कर्नाटक दक्षिण तमिळनाडूपर्यंत ९०० मी. अंतरावर खंडित वाऱ्याची परिस्थिती पहायला मिळते. राजस्थानातील काही भाग आणि समुद्रसपाटीपासूनचा काही अंशी भागादरम्यान वाऱ्याची परिस्थिती जाणवत असल्याने विदर्भात ऊन, वारा, पाऊस असे मिश्रित वातावरण पहायला मिळत आहे.