Weather Update : राज्यात आज, उद्या अवकाळी पावसाची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कसे राहील हवामान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. आज (ता.२४) या दिवशी राज्याच्या इतर भागात विदर्भात तुरळक प्रमाणात गारपीट असणार आहे. तसेच आज ता. (२४) पासून (२) मे पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पाठ सोडणार नसल्याचे हवामान खात्याने (Weather Dept) अंदाज वर्तवला आहे.

काल (ता.२३) या दिवशी चंद्रपूरमधील तापमान हे ३९ अंश तापमान होते. राज्यात ४३ अंश असलेल्या तापमानात घट झाली आहे. ते तापमान ४० अंश पहायला मिळत होते. उर्वरित राज्यात २३ ते ३९ अंश तापमान पहायला मिळत आहे.

आपल्या गावात किती दिवस पाऊस पडणार आहे. हे पहायचं असेल तर हे करा

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या गावात किती दिवस पाऊस पडणार आहे. तसेच आपल्या गावाचं वातावरण कसे आहे. हे जाणून घेण्यासाठी Hello krushi ॲप डाऊनलोड करा. त्यासाठी गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करून ॲप इंस्टॉल करा. त्यात हवामान खाते हा पर्याय निवडून आपल्याला आपल्या गावातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर मिळू शकतो. तसेच सातबारा उतारा डाऊनलोड, सरकारी योजना, जमीन मोजणी, शेतकरी दुकानाच्या मदतीने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री अशा इतरही सेवा Hello krushi ॲपद्वारे मिळू शकतात.

आज राज्यात मराठवाडा, विदर्भात गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यातील काही भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.

या भागात येलो अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्र : सातारा, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : बीड, धाराशिव, परभणी, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या भागात गारपिटीचा इशारा हवामान खात्याने (Weather Dept) दिला आहे.

error: Content is protected !!