Weather Update: बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळामुळे दक्षिणेला मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके; महाराष्ट्रात ‘या’ काळात पावसाची शक्यता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय हवामान विभाग (IMD) ने येत्या आठवड्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला असून, देशभरात लक्षणीय बदलांचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळापासून (Cyclone Alert) दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके राहणार आहेत. तमिळनाडू, केरळ या भागात मुसळधार पाऊस आणि उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर काही भागात दाट धुक्याचा अंदाज (Dense Fog Forecast)  IMD ने वर्तवला आहे. उत्तर आणि मध्य भारतात येत्या काही दिवसांत दाट धुके आणि स्थिर तापमानाचा परिणाम होणार आहे (Weather Update).

21 नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.  23 नोव्हेंबरपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनून पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि पुढील दोन दिवसांत नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे (Weather Update).

पावसाचा अंदाज आणि इशारे (Weather Alert)

IMD ने 21 ते 26 नोव्हेंबर 2024 दरम्यानच्या कालावधीसाठी पावसाचा अंदाज आणि संबंधित इशारे जारी केले आहेत. भारतातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि दाट धुके देखील राहणार आहेत.

दाट धुक्याच्या सूचना

येत्या काही दिवसांत भारताच्या अनेक उत्तर आणि मध्य भागात दाट धुक्याची स्थिती राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी होईल. भारतीय हवामान खात्याने पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या भागांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे (Weather Update).

महाराष्ट्रात पावसाचा अंदाज (Weather Update Maharashtra)

 हवामान तज्ज्ञांनी 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे (Weather Update). आणखी एक आठवडा महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील आणि कडाक्याची थंडी सुरूच राहणार आहे पण आठवड्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान राहणार असून पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील अगदीच तुरळक ठिकाणी झालाच तरी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. यादरम्यान थंडी काही प्रमाणात कमी होईल.

error: Content is protected !!