हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान खात्यानुसार, (Weather Update) आज तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. काही राज्यांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना जवळपास अर्धा संपत आला असला तरी उत्तर भारतातील (North India) अनेक राज्यांमध्ये थंडी अजून सुरू झालेली नाही. अशी काही राज्ये आहेत जिथे अनेक दिवसांपासून सकाळी आणि संध्याकाळी सौम्य थंडी जाणवत आहे. यंदा देशभरात भरपूर पाऊस झाला असून, त्यानंतर यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे (Weather Update).
महाराष्ट्रात हलका ते मध्यम पावसाची शक्यता (Maharashtra Weather Alert)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सध्या जरी कोरडे वातावरण असले तरी काही भागात 14 ते १५ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे (Weather Update).
कोल्हापूर जिल्हा आणि घाट भाग तसेच सांगली जिल्ह्यात 14 नोव्हेंबर रोजी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्हा आणि घाट भाग, सातारा जिल्हा आणि घाट भाग, तसेच सांगली जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून ढगांचा गडगडाट आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
असे असणार देशातील हवामान (Weather Update India)
हवामान विभागाच्या मते, 14 नोव्हेंबर पर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ येथे विविध ठिकाणी गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूवर मुसळधार, 12 ते 14 नोव्हेंबर दरम्यान कोस्टल आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा, 13 ते 16 नोव्हेंबर दरम्यान केरळ, आणि 14 नोव्हेंबर रोजी किनारपट्टी आणि दक्षिण कर्नाटकात काही ठिकाणी पाऊस पडू शकतो .
IMD नुसार, पुढील 2 दिवसांत पश्चिम पंजाब आणि उत्तर-पश्चिम राजस्थानच्या काही भागात रात्री आणि सकाळच्या वेळी दाट ते खूप दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या काही भागात पुढील 3 दिवसांमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे (Weather Update).
जोरदार वारे वाहण्याची शक्यता
IMD नुसार, आज, नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या अनेक भागांवर आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर, श्रीलंका, तमिळनाडू किनारे, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरिन भागात 35 ते 45 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत आहेत ताशी 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. अशा परिस्थितीत मच्छिमारांनी या भागात न जाण्याचा सल्ला विभागाने दिला आहे.
राजधानी दिल्लीच्या तापमानात किंचित घट झाली आहे. येथे किमान तापमान 18-19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 ते 33 अंश सेल्सिअस आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 16 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीच्या तापमानात चढ-उतार होऊ शकतात. 15 नोव्हेंबरनंतर एनसीआरमध्येही थंडी वाढण्याची शक्यता आहे (Weather Update).