Weather Update: राज्याच्या तापमानात तीव्र घट होऊन थंडीची लाट येणार; देशातील 7 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे (Weather Update) वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट (Cold Wave) जाणवणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये विशेषत: मध्यरात्री तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

काल मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये कडाक्याची थंडी पडून तापमान 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. गेल्या आठवड्यात सरासरी किमान तापमान 12°C ते 14°C दरम्यान होते. तथापि, थंड उत्तरेकडील वाऱ्यांच्या आगमनाने हिवाळ्याची थंडी आणखीनच वाढली असून, राज्यभरातील अनेक भागात तापमान 13°C च्या खाली गेले आहे (Weather Update).

सकाळी तापमानात वाढ, संध्याकाळी थंडीची लाट (Weather Update)

दुपारच्या कडक उन्हामुळे थंडीपासून थोडासा दिलासा मिळत असला तरी, संध्याकाळ आणि रात्री थंडीच्या लाटेमुळे तापमानात मोठी घट दिसून येते. सध्या संध्याकाळी लवकर अंधार पडून लगेचच थंडीची तीव्रता वाढत आहे. यामुळे शहरातील रहदारीवर सुद्धा परिणाम झालेला असून लोक कमी प्रमाणात घराबाहेर पडताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात (Weather Update Maharashtra) पहाटेच्या सुमारास गारठा जास्त वाढला असून 8-10 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. काही ठिकाणी 12 अंश डिग्री सेल्सियसपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसांत तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. थंडीची तीव्रता वाढण्याची अपेक्षा असताना, नोव्हेंबरच्या अखेरीस ढगाळ हवामानाचाही अंदाज आहे, ज्यामुळे तात्पुरता आराम मिळू शकतो किंवा तापमानात आणखी घट होऊ शकते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. येत्या 48 तासात सामान्यपासून दीड ते तीन अंश सेल्सियस तापमान कमी होण्याची शक्यता आहे (Weather Update).

या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता (Heavy Rain Prediction States)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. आज रात्री/सकाळी हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे (Weather Update).

error: Content is protected !!