Weather Update: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; यंदा मॉन्सून 19 मे पर्यंत होऊ शकतो अंदमानात दाखल!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मोसमी वारे (Weather Update) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी (Weather Expert) व्यक्त केलेला आहे. जर मॉन्सूनची (Monsoon) वाटचाल अशीच राहिली तर यंदा 19 मे (रविवार) पर्यंत मॉन्सून अंदमानात (Weather Update) दाखल होऊ शकतो.

सध्या मॉन्सूनची वाटचाल (Weather Update)

सध्या दक्षिण अंदमान समुद्र (Andaman Sea) आणि निकोबार बेटांवर समुद्रसपाटीपासून 1 ते 1.5 किलोमीटर उंचीवर नैऋत्ये कडून येणारे वारे (Southwest Winds) वाहत आहेत. हे वारे येत्या दोन दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि हळूहळू अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) प्रगती करतील.

केरळमधील आगमन

नैऋत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर पुढे केरळच्या (Kerala) दिशेने वाटचाल करतील आणि 1 जून रोजी सरासरी तारखेला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

यंदा चांगला पाऊस

हवामान विभागाने अंदाज (Weather Update) वर्तवला आहे की यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Rainfall) होण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये केलेल्या अंदाजानुसार, यंदा 106% पावसाची शक्यता आहे. तर, मे महिन्याच्या शेवटी सुधारित अंदाज जारी केला जाईल.

मध्य महाराष्ट्रात पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अलर्टमध्ये म्हटले आहे की सध्या कर्नाटकमध्ये चक्रीवादळ (Cyclone) सक्रिय आहे आणि पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तिसगड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (40-60 किमी प्रति तास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे (Weather Update) .

शेतीसाठी अच्छे दिन

वेळेवर आणि चांगल्या प्रमाणात पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना (Kharif Crops)  फायदा होईल आणि शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.