Weather Update : यंदा मान्सून उशिराने दाखल होणार, मुंबईची तारीख समोर; पहा हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील मान्सून यंदा कमी असणार आहे. काही प्रमाणात दुष्काळ असणार आहे. असा ‘अल निनो’ हवामान खात्याने अंदाज वर्तवला असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळात दाखल होतो. मात्र यंदा नैऋत्य मोसमी वारे उशिराने दाखल होत आहेत. या अंदाजानुसार मान्सूनचे आगमन चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात मान्सून हा ९ जूनपर्यंत येणार असून मुंबईत १५ जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार आहे.

स्कायमेटकडून यंदाचा मान्सून हा उशिरा येईल असा अंदाज आहे. तर भारतीय हवामानानुसार यंदाचा मान्सून हवामान अंदाज हा सर्वसाधारण राहील असे बोललं जात आहे. यावर्षी उत्तरेकडील जूनपर्यंत हवामान कायम राहण्याचा अंदाजामुळे पेरणीस उशीर होईल.

अशी असते मान्सूनची सुरुवात :

२२ मे मध्ये अंदमान या ठिकाणी मान्सूनची हजेरी असते.

१ जूनमध्ये केरळ येथे मनसुंची सुरुवात होते.

७ जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी लावली जाते.

११ जून या दिवशी मुंबई शहरात मान्सूनचे आगमन होते.

हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी हे करा :

शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला दररोजचे हवामान अंदाज जाणून घ्यायचे असल्यास एक गोष्ट मात्र करावी लागेल. यासाठी सुरुवातीला Hello krushi ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲपचे नाव सर्च करा आणि ॲप इंस्टॉल करा. या ॲपद्वारे हवामान अंदाजावर क्लिक करून आपल्याला दररोजचे हवामान जाणून घेता येते. दररोज कुठे पाऊस, ऊन किती हे सहजरीत्या जाणून घेता येते.

मान्सूनचे केरळातील आगमन

वर्ष आगमनाचा अंदाज प्रत्यक्ष आगमन

२०१८ २९ मे २९ मे

२०१९ ६ जून ८ जून

२०२० ५ जून १ जून

२०२१ ३१ मे ३ जून

२०२२ २७ मे २९ मे

error: Content is protected !!