हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशामध्ये पुढील तीन महिने सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Weather Update) पडू शकतो. विषुववृत्तीय भागात प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती कायम असून, मार्चच्या शेवटी पर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार आहे. तर चालू जानेवारी महिन्यामध्ये मध्य भारतातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये तापमान अधिक राहणार असल्याने, या भागांमध्ये थंडीची लाट (Weather Update) येण्याचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाने व्यक्त केला आहे.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या त्रेमासिक अंदाजात हवामान विभागाने (Weather Update) म्हटले आहे की, जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांच्या काळात भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक (112 टक्के) पाऊस होण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांमध्ये देशभरात सरासरी 69.7 मिमी पाऊस होऊ शकतो. या काळात उत्तर भारतीय राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते. जानेवारी महिन्यामध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक तापमान राहणार असल्याने मध्य भारतातील महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जानेवारी महिन्यात थंडी कमी राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान पावसात तूट (Weather Update Today 2 Jan 2024)
दरम्यान, ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या काळात देशात सरासरी 110.7 मिमी (91 टक्के) पावसाची नोंद झाली आहे. या काळात महाराष्ट्रात सरासरी 96.4 मिमी पावसाची नोंद झाली असून, मॉन्सूनोत्तर हंगामात राज्यात 59.3 मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्याचा विचार करता राज्यात सरासरी 4.6 मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यावर्षी डिसेंबर महिन्यात राज्यात 6.1 मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत केवळ 33 टक्के पाऊस पडला आहे.
चालू आठवडा पावसाचा
जानेवारी महिन्यात 5 ते 11 तारखांदरम्यान देशातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती कायम राहू शकते. मध्य भारतातील काही भागांमध्ये विशेषतः मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर प्रदेश राज्याचा दक्षिणी भाग याशिवाय हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची स्थिती कायम राहू शकते. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.