Weather Update : यंदा देशात चांगला पाऊस; स्कायमेटचा प्राथमिक अंदाज जाहीर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’ने सध्या पावसावर एल निनोचा (Weather Update) सुरु असलेला प्रभाव हा येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार आहे. तसेच यावर्षी समाधानकारक पाऊस होणार असल्याचे म्हटले होते. तर सोलापुरच्या सिद्धनाथ यात्रेत वर्षानुवर्षे पावसाचे भाकीत करण्याची परंपरा असलेल्या भाकणुकीतही यंदा चांगला पाऊस पडणार असून, जगात शांतता नांदणार (Weather Update) असल्याचे म्हटले होते.

अशातच आता देशातील आघाडीची हवामान संस्था असलेल्या स्कायमेटकडून देखील 2024 मधील मान्सूनच्या अंदाजाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यंदा देशात एल निनो सक्रीय राहण्याची फारशी शक्यता नसून, देशभरात चांगला पाऊस चांगला पडू शकतो. असा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता राज्यासह देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील संपूर्ण वर्ष हे कधी पाऊस, तर कधी पावसाचा खंड यात गेल्याने शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे यावर्षी शेतकरी पावसाबाबत मोठी अपेक्षा लावून बसले आहेत. अशा शेतकऱ्यासांठी निश्चितच ही एक सकारात्मक बाब मानली जाणार आहे.

एप्रिलमध्ये तपशीलवार माहिती (Weather Update Skymet’s Forecast)

स्कायमेटचे संस्थापक आणि सीईओ जतिन सिंग यांनी 2024 मधील मान्सूनच्या अंदाजाबाबत म्हटले आहे की, भारतात 2024 मध्ये मान्सून चांगला राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मान्सून हंगामात एल निनो कमकुवत राहणार असल्याने त्याचा मान्सूनवर फारसा फरक पडणार नाही. सक्रिय एल निनोमुळे मान्सून कमकुवत होतो. त्यामुळे पाऊस कमी होऊन शेतीवर विपरित परिणाम होतो. ज्याच्या परिणाम आपल्याला मागील वर्षभरात पाहायला मिळाला. मात्र, सध्याचे संकेत आगामी मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती सूचित करत आहेत. तसेच मान्सूनच्या अंदाजाबाबत अधिक तपशीलवार माहिती ही एप्रिलमध्ये जारी केली जाईल. असेही त्यांनी अंदाजाबाबत म्हटले आहे. दरम्यान, सध्या व्यक्त करण्यात आलेल्या प्राथमिक अंदाजाने शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!