Weather Update : राज्यातील ‘या’ भागात आज विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडवली असून त्यामुळे ऐन काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात काल विजांसह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. दरम्यान आज दिनांक ८ रोजी देखील सर्वदूर पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी वीज आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान स्थिती

परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा शुक्रवारी (ता. ७) कायम होती. तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरातपर्यंत एक, तसेच तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेष उत्तराखंड पर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा (Weather Update) सक्रिय आहे. वरील प्रणाली पोषक ठरल्यामुळे राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असले तरी उकाडा मात्र वाढला आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

दरम्यान, हवामान खात्याकडून आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यमहाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यात विजांसह पावसाचा इशारा (Weather Update) म्हणजेच (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

 

error: Content is protected !!