Weather Update : गणेशाच्या आगमनाला पावसाचाही वर्णी; आज ‘या’ भागांत होणार विजांसह पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात गणेशोत्सवाची धामधूम चालू असताना, गणेशोत्सव काळात पावसाने (Weather Update)  देखील हजेरी लावली बुधवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाने दमदार हजेरी लावली. आजही राज्यातल्या तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे वावरातल्या माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज पुढील चार -पाच तासात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात,मराठवाडा,कोकणातील काही भाग, मेघगर्जनेसह पावसाची (Weather Update) शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून राज्यातील घाट भागात‌ पावसाची अधिक शक्यता आहे.

आज या भागात पाऊस

आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी गोवा आणि कोकण विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भात देखील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!