Weather Update : राज्यात आज मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात विजांसह पाऊस पडत आहे. दरम्यान आजही हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्याता आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील जिल्ह्यांसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, आजपर्यंत (ता. १०) ही प्रणाली आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तर आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून, हा पट्टा जैसलमेर, उदयपूर, जळगाव, रामगुंडम, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण कोकणापासून उपसागरातील कमी दाब प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

आज या भागाला अलर्ट जारी

हवामान खात्याकडून आज राज्यातील सर्व जिल्ह्याना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडेसह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून इतर सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!