Weather Update: राज्यात थंडीची प्रतीक्षाच; कमाल तापमानात मात्र वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. मागच्या २४ तासात किमान ११.६ अंश सेल्सिअस तापमाची नोंद करण्यात आली असून राज्यात कमल तापमान ३० -३५ अंशांपर्यंत (Weather Update) पोहचले आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि पहाटे गारठा अशी स्थिती राज्यातील बहुतांश भागात आहे. आज राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान स्थिती

नैॡत्य बंगालच्या उपसागरात ईशान्य श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत शुक्रवारी (ता. ११) ठळक कमी दाबाचे क्षेत्र (Weather Update) सक्रिय होते. वायव्येकडे सरकत असलेली ही प्रणाली शनिवार सकाळपर्यंत (ता. १२) तमिळनाडू आणि पद्दूचेरीच्या किनारपट्टीकडे पार करणार असून, त्यानंतर रविवारपर्यंत (ता. १३) केरळ अरबी समद्राकडे जाण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे.

कुठे किती तापमान ? (Weather Update)

शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१२.८)
नगर ३१ (१५.३)
जळगाव – (१४.६)
धुळे ३२ (१२)
कोल्हापूर ३१.१ (१७.३)
महाबळेश्‍वर २४.१(१३.६)
नाशिक २९.६ (१३.८)
निफाड ३२.२ (११.६)
सांगली ३१.९ (१७.४)
सातारा ३१ (१५.६)
सोलापूर ३२.४ (१५.४)
सांताक्रूझ ३४.८ (२१)
डहाणू ३२.८ (२०.६)
रत्नागिरी ३४.८ (२१)
औरंगाबाद ३०.५ (१४)
नांदेड ३३.२ (१७.२)
उस्मानाबाद ३०.५ (१३.८)
परभणी ३०.६ (१६)
अकोला ३३ (१७.२)
अमरावती ३२.६ (१५.३)
बुलडाणा ३०.४ (१८.३)
ब्रह्मपुरी ३२.२ (१७.४)
चंद्रपूर ३०.४ (१८.३)
गडचिरोली ३१.६ (१५.८)
गोंदिया ३०.४(१६.२)
नागपूर ३१.६ (१७)
वर्धा ३१.२(१७.४)
वाशीम – (१७.२),
यवतमाळ ३१.५ (१५.५).

error: Content is protected !!