Weather Update : चक्रीवादळाचा परिणाम ! राज्यातील अनेक भागात पाऊस; आज ‘या’ भागात लावणार हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मदौस चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) म्हणून राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पाऊस हजेरी लावतो आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, साताऱ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल (११) पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज (१२) देखील राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. आज पुणे,औरंगाबाद, जालना, बीडसह इतरही जिल्ह्यात वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान स्थिती

नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे (मदौस) अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार नैऋत्य बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये 10 किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. 9 डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन 75 ते 85 किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची ((Weather Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहण्याचीही शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम हा महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात 9 ते 16 डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!