Weather Update : राज्यात आज कोणत्या जिल्ह्यात किती थंडी? पहा आजचा हवामान अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील चार दिवसांपासून राज्यात सर्वत्रच थंडीचा (Cold Weather) कडाका वाढला आहे. आज महाराष्ट्रातील (Weather Update) अनेक जिल्ह्यांत 15 सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. यामध्ये सर्वात कमी तापमान पुणे जिल्ह्यात पाहायला मिळाले. आज पुण्यामध्ये 9.2 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे.

राज्यात शुक्रवारी सर्वत्रच थंडी पाहायला मिळाली. यामध्ये Aurangabad येथे 9.8, सातारा 10.4, अहमदनगर 9.6 तर सोलापूर 15.1 डिग्री सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. यानंतर नांदेड 13.9, कोल्हापूर 15.3, उदगीर 14.5, जळगाव 12.6 तर हरनाइ 19.6 तापमानावही नोंद झाली. डहाणू, परभणी, रत्नागिरी, मालेगाव, नाशिक या जिल्ह्यांत तुलनेने कमी थंडी जाणवली.

असा मिळवा पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हवामानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळता येणार आहे. कारण आता एकही रुपया खर्च न करता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा हवामान अंदाज मोबाईलवरून मिळत आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. यांनतर हॅलो कृषीचे मोबाईल अँप Install करून मो. ना. टाकून रजिस्ट्रेशन केल्यांनतर तुम्हाला होम स्क्रीनवरच तुमच्या गावाचे नाव येते. तसेच हवामान अंदाज या विंडोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील पुढील तीन दिवसांचा अचूक हवामान अंदाज जाणून घेतो येतो.

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही गारठा वाढला असून शेतपिकांचीही काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यामध्ये हरभरा, पपई अशा पिकांवर खबरदारी म्हणून योग्य ती फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामानातील बदलांमुळे शेतीमधील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची वेळीच काळजी घेतली नाही तर याचा तोटा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात आज कोणत्या जिल्ह्यात किती थंडी पहा (Weather Update Today) –

Aurangabad 9.8
Satara 10.4
Pune 9.2
Slp 15.1
Nanded 13.9
Klp 15.3
Udgir 14.5
Jalgaon 12.6
Harnai 19.6
MWR 11.5
Dahanu l19.4
Parbhani 13
RTN 18
Malegaon 15.6
Nashik 13
Baramati 10.4
Matheran 14
CLB 20.8
SCZ 19.4
Osbad 9
Jalna 14.2
Ahmednagar 9.6

error: Content is protected !!