Weather Update : विदर्भात विजांसह पाऊस लावणार हजेरी; ‘या’ भागाला यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कोकण घाटमाथ्यावर पावसाने (Weather Update) दमदार हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित राज्यात पाऊस ओसरला असून काही भागात रिम झिम पावसाच्या सरी बरसत आहेत. आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने वर्तविली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील तीव्र कमी दाब क्षेत्रापासून ईशान्य बंगाल उपसागर पर्यंत कायम आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही (Weather Update) चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्टच्या सुमारास बंगालच्या उपसागरात डिप्रेशन निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम -उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावाखाली, १३, १४ ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पावसाचा जोर वाढेल. अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा (Weather Update) जोर ओसरला आहे. तर घाटमाथ्यावर मात्र पावसाचा दणका सुरूच आहे. आज (ता. १३) कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!