हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात जानेवारी महिन्यापासून तापमानात (weather Update) मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांपासून तर राज्यात थंडीने अक्षरशः कहर केला आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्येही अतिशय कमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतकरी मित्रांनो हरभरा, गहू या पिकांना थंडीमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता असते. वेळीच योग्य ती खबरदारी घेतल्यास रोग किडीला निर्बंध घालून नुकसान टाळता येऊ शकते. मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कडाक्याची थंडी पडल्यावर हरभरा, गहू पिकांवर कशाची फवारणी करावी? या आमच्या कालच्या लेखात तुम्ही यावर माहिती वाचू शकता.
असा मिळवा तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज
शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा अचूक हवामान अंदाज मिळणे शक्य झाले आहे. Hello Krushi या मोबाईल अँप वर हवामान अंदाजासोबत रोजचा बाजारभाव पाहतो येतो. तसेच सातबारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्र सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री करता येते. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करायचं आहे. यानंतर हॅलो कृषीचे अँप इन्स्टॉल करून मो.न. टाकून रजिस्टर करायचं. आता तुम्हाला या सर्व शेती उपयुक्त सर्व सेवांचा मोफत लाभ घेता येऊ शकेल.
Maharashtra Tmin, 14 Jan, गारवा
Jalgaon 8🙄
Udgir 15
Pune 9.9🙄
Baramati 10.7
Nagar 13.7
Satara 11
Nashik 8.8🙄
Klp 15
Slp 14.3
MWR 12.5
Malegao 12.8
Aurangabad 8.8
Nanded 14.2
Jalna 15.3
Parbhani 13.4
Osbad 10.5
Rtn 17.5
Dahanu 14.2
Harnai 17.6
CLB 17.4,SCZ 15.2
Matheran 11.6
IMD साजरा करणार १४८ वा वर्धापन दिन
दरम्यान, १५ जानेवारीला भारत मौसम विज्ञान केंद्र (Indian Meteorological Department) यांचा १४८ वा स्थापनादिवस साजरा केला जाणार आहे. मागील १४८ वर्षांपासून IMD देशातील नागरिकांना अचूक हवामान अंदाज देऊन अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडत आहे. शेतकऱ्यांसाठी तर IMD कडून देण्यात येणारा हवामान अंदाज सर्वाधिक उपयोगी ठरत असून यामुळे शेतकरी हवामानातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे संभाव्य नुकसान टाळण्यात यशस्वी होत आहेत.