Weather Update : आजपासून पाऊस ओसरण्याचे संकेत; मात्र ‘या’ भागात पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकुळ सुरू आहे. आजपासून हा पाऊस (Weather Update) ओसरण्याचे संकेत आहेत. कोकण, महाराष्ट्राच्या दक्षिण भागात विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस ओसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान स्थिती

कोमोरिन आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Weather Update) आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच पूर्व-मध्य अरबी समुद्रात कोकण, गोव्याच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वायव्य भारतातून ३ ऑक्टोबर रोजी परतले. मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा गुरुवारी कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने दोन दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. तर त्यानंतरच्या पुढील दोन दिवसांत संपुर्ण गुजरातसह महाराष्ट्र, पूर्व भारताच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याचे संकेत आहेत.

दिवाळीतही पावसाची शक्यता

आज शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही (Weather Update) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार नंतर पाऊस थांबणार असला तरी दिवाळी दरम्यान २० ते 24 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे ,अहमदनगर, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

error: Content is protected !!