Weather Update: कमी दाबाचे क्षेत्र आरबी समुद्राकडे; राज्यात गुलाबी थंडीची प्रतीक्षाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या तापमानातील चढ उतार (Weather Update) चालूच आहे. पहाटे गारठा आणि दिवसभर उन्हाचा चटका ही स्थिती कायम आहे. हवामान अंदाजानुसार किमान तापमानत घट होत असली तरी अद्याप गुलाबी थंडीसाठी वाटच पहावी लागणार आहे. दरम्यान मागच्या २४ तासात किमान १३ अंशांची नोंद राज्यात करण्यात आली आहे.

हवामान स्थिती

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तामिळनाडू, पद्दुचेरी, केरळवरून प्रवास करून अरबी समुद्राकडे सरकले आहे. ही प्रणाली (Weather Update) रविवारी (ता. १३) उत्तर केरळ आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्रात होती. आग्नेय बंगालच्या उपसागरात १६ नोव्हेंबरपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान आणि कमाल तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहेत. सध्या किमान तापमान ११ ते १८ अंशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पारा आणखी घसरून गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी काहीशी वाट पहावी लागणार आहे.

कुठे किती तापमान ? (Weather Update) 

रविवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.६ (१३.३)
जळगाव ३२.० (१७.०)
धुळे ३१.० (१३.५)
कोल्हापूर ३१.७ (१७.८)
महाबळेश्वर २५.१(१३.४)
नाशिक २९.४ (१४.३)
निफाड ३०.२ (१३.०)
सांगली ३२.३(१६.९)
सातारा ३०.३(१५.०)
सोलापूर ३३.८ (१७.७)
सांताक्रूझ ३४.६(२३.२)
डहाणू ३४.५ (२१.१)
रत्नागिरी ३६.३ (२१.०)
औरंगाबाद २९.८ (१४.२)
नांदेड ३२.८ (१७.०)
उस्मानाबाद – (१६.४)
परभणी ३०.९ (१५.५)
अकोला ३२.२ (१८.५)
अमरावती ३१.८ (१७.१)
बुलडाणा २९.४ (१७.४),
ब्रह्मपुरी ३२.४ (१६.१)
चंद्रपूर ३०.४ (१७.६)
गडचिरोली ३२.०(१५.६)
गोंदिया ३०.८(१६.०)
नागपूर ३०.९ (१५.०)
वर्धा – (१६.६)
वाशीम ३२.६ (१७.०)
यवतमाळ ३१.० (१५.०).

error: Content is protected !!