Weather Update : राज्याला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागाला आज ऑरेंज अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने (Weather Update) हजेरी लावली आहे. इथून पुढे दोन तीन दिवस देखील राज्यातलया काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

हवामान तज्ञ के.एस . होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 3, 4 दिवस आणि त्यापुढील दिवसात मान्सून (Weather Update) राज्यात सक्रिय राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर याचा परिणाम होऊ शकतो अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जरी केले आहेत.

आज ‘या’ भागाला अलर्ट

दरम्यान आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्याला तसेच मुंबईला देखील येलो अलर्ट देण्यात आला असून या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला नाही

error: Content is protected !!