Weather Update : राज्यात सर्वाधिक थंडी कुठे आहे? तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात सर्वत्र तापमानात (Weather Update) घट झालेली पाहायला मिळत आहे. गारठा वाढल्याने शेतकऱ्यांनीही संपल्या पिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. गहू, हरभरा, पपई अशा पिकांवर जास्त थंडीमुळे रोग पसरण्याची भीती असते. तेव्हा वेळीच योग्य ती औषध फवारणी केली तर शेतीमधील होणारे नुकसान टाळता येऊ शकते. आज राज्यात कोणत्या जिल्यात काय तापमान आहे याची माहिती आपण घेणार आहोत.

आज राज्यात सर्वाधिक थंडी जळगाव (Jalgaon) येथे पडली आहे. जळगाव येथे आज 7.8 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तसेच नाशिक (Nashik) येथे 8.4 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद (Aurangabad) येथे 8.8 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान या तीन जिल्ह्यात नोंद झाले आहे.

दरम्यान, हरणाई येथे सर्वाधिक तापमानाची नोंद जाहली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हरणाई (Harnai) येथे 27.3 डिग्री सेल्सिअस इतके तापमान होते. त्यानंतर ठाणे (Thane) 17.2, पुणे (Pune) 10.7, सातारा (Satara) 12.7, नांदेड (Nanded) 14.5, कोल्हापूर (Kolhapur) 16 अशी तापमानाची नोंद झाली आहे.

तुमच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज कसा मिळवायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्याला आपल्या स्वतःच्या गावातील पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज मिळवणे शक्य झाले आहे. Hello Krushi या मोबाईल अँप वर आपल्याला प्रत्येक गावातील अचूक हवामान अंदाज सांगितला जातो. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे जमिनीचा सातबारा, नकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्रेही सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात. तसेच आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने मोजता येते. खालील Download बटनावर क्लिक करून या सेवांचा मोफत लाभ घ्या.

महाराष्ट्र Tmin on 15 Jan
Thane 17.2
Pune 10.7
Satara 12.7
Nanded 14.5
Klp 16
Aurangabad 8.8🙄
Udgir 14.5
Rtn 15.8
Slp 15.6
Jalgaon 7.8🙄
Parbhani 13.5
Malegaon 12
MWR 13.7
Dahanu 13.1
Harnai 27.3
Nashik 8.4🙄
Osbad 11.1
Baramati 11.8
Matheran 13.6
Sangli 14.9
Jalna 16

error: Content is protected !!