Weather Update : राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात सध्या पहाटेच्या वेळी गारठा दव आणि धुक्याचा अनुभव (Weather Update) होत असून दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यात किमान आणि कमाल तापमानात सतत चढ उतार होत असून मागच्या २४ तासात किमान १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज ( १५) राज्यात कोरड्या हवामान व आकाश निरभ्र राहून, तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढू लागला आहे. उद्यापासून मध्य प्रदेश आणि वायव्य भारताच्या ( Weather Update) किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांची घट होण्याचे संकेत आहेत. परिणामी राज्यातही किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राकडे सरकल्यानंतर निवळून गेले आहे. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून केरळ, तामिळनाडू, कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात उद्या (ता. १६) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

कुठे किती तापमान ( Weather Update)

सोमवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३०.४ (१३.९)
जळगाव ३५.८ (१६.३)
धुळे ३०.० (१३.०)
कोल्हापूर ३१.८ (२१.१)
महाबळेश्वर २७.१(१६.०)
नाशिक २८.७ (१५.१)
निफाड ३०.५ (१२.५)
सांगली ३२.६(१९.१)
सातारा ३१.१(१६.४)
सोलापूर ३४.३ (१९.४)
सांताक्रूझ ३४.८(२१.२)
डहाणू ३४.८ (२१.१)
रत्नागिरी ३५.८ (२४.३)
औरंगाबाद २९.४ (१२.८),
नांदेड ३३.२ (१६.८)
उस्मानाबाद – (१९.०)
परभणी ३०.५ (१५.०)
अकोला ३२.० (१७.०)
अमरावती ३१.० (१४.८)
बुलढाणा २९.५ (१५.५)
ब्रह्मपूरी ३२.२ (१५.४)
चंद्रपूर २९.६ (१६.४)
गडचिरोली ३१.४(१५.२)
गोंदिया २९.५(१३.६)
नागपूर ३०.४ (१३.०)
वर्धा – (३०.४)
वाशीम ३२.४ (१७.०)
यवतमाळ ३०.५ (१३.०).

error: Content is protected !!