Weather Update : राज्यात किमान तापमानात चढ -उतार; आज मुख्यतः कोरडे हवामान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात सध्या ढगाळ हवामान (Weather Update) अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात चढ- उतार होत आहे. बुधवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र आज राज्यातील हवामन मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान स्थिती

पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागून चक्राकार वाऱ्यांची (Weather Update) स्थिती आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात आहे. तर दक्षिण अंदमान समुद्रात सुमात्रा बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. १५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे.

वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली आहे. बुधवारी (ता.१४) राज्याच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण कायम होते. आज (ता. १५) पावसाळी वातावरण निवळण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील चुरू येथे बुधवारी (ता. १४) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस होते. उर्वरित राज्यात किमान तापमान १६ ते २६ अंशांच्या दरम्यान होते.

कुठे किती तापमान ? (Weather Update)

बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.२ (१८.३), जळगाव ३१.६ (२१.७), धुळे ३२.० (१९.०), कोल्हापूर २६.८ (२१.०), महाबळेश्वर २०.६(१६.५), नाशिक २९.७ (२०.८), निफाड २९.८ (२१.५), सांगली २८.२ (२१.३), सातारा २५.८(१६.१), सोलापूर ३१.२ (२०.५), सांताक्रूझ ३४.५(२५.६), डहाणू ३४.३ (२४.३), रत्नागिरी ३४.५ (२५.८), औरंगाबाद २९.२ (१८.०), नांदेड ३०.८ (२१.२), उस्मानाबाद २९.६ (१९.०), परभणी ३०.२ (२०.६), अकोला ३१.८ (२२.६), अमरावती २९.० (२०.३), बुलडाणा २८.८ (२१.४), ब्रह्मपुरी ३२.७ (२०.८), चंद्रपूर ३०.० (२०.८), गडचिरोली ३१.०(१८.६), गोंदिया २९.५(१९.२), नागपूर ३०.६ (२०.६), वर्धा ३१.५(२०.५), यवतमाळ ३१.० (२०.५).

error: Content is protected !!