Weather Upadate : राज्यात पावसाचा जोर ओसरला ; पुणे, सातारा आणि पालघरला ऑरेंज अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने (Weather Upadate) जुलै मध्ये दमदार हजेरी लावली आहे. राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. मात्र राज्यातल्या काही भागात मात्र मुसळधार पाऊस झाल्याने पिकांचे नुकसानही झाले आहे. मागच्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज दिनांक १५ रोजी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील तुरळक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिनांक 15 रोजी पुणे, सातारा आणि पालघर जिल्ह्याला हवामान (Weather Upadate) खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, आणि गडचिरोली या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे तर इतर भागात हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे

दरम्यान हवामान तज्ञ के . एस . होसळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार (Weather Upadate) राज्यात दिनांक 14 रोजी सांगली जिल्हा वगळता इथे रात्र सौम्य स्वरूपाचा पाऊस झाला आहे . गेल्या काही दिवसांपासून ठळक कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा आस, महाराष्ट्राच्या मध्य भागातून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर पूर्व-पश्‍चिम दिशेने वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र या वातावरणीय प्रणाली कायम आहेत. यातच अरबी समुद्रातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!