Weather Update : या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने दिला इशारा; पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात आज तापमानात (Weather Update) घट झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे, मुंबई या प्रमुख शहरांसह उत्तर महाराष्ट्रात थंडीने हुडहुडी भरवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांसाठी तीव्र शीत लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची, फळबागांची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.

राज्यात आज सर्वात कमी तापमानाची नोंद जळगाव, औरंगाबाद येथे झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यांत आज १० डिग्री सेल्सिअस अशा तापमानाची नोंद झाली. यानंतर नाशिक (Nashik) १०.५, पुणे (Pune) 10.8, सातारा (Satara) 12.7, बारामती (Baramati) 12.2, परभणी (Parbhani) 13 असे तापमान नोंदवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात माळीण येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तसेच लोणावळा पेक्षाही कमी तापमान पुणे शहरात. असून शिवाजीनगर भागात आज १०.६ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे.

पुढील पाच दिवस कसे राहणार वातावरण?

दरम्यान, १७ जानेवारी, १८ जानेवारी या कालावधीत दिवसा लख्ख सूर्यप्रकाश असेल मात्र १९, २० जानेवारी दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामध्ये सातारा, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यात पुढील पाच दिवसांत थंडी अजून वाढण्याची शक्यता आहरे.

असा मिळवा तुमच्या गावातील हवामानाचा अचूक अंदाज

शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गावातील हवामान अंदाज मिळणेही शक्य झाले आहे. यासाठी मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करूनघ्या. इथे हवामान अंदाजासोबतच तुमच्या जमिनीचा सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्रीही करता येते. आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने मोजताही येते.

राज्यातील इतर जिल्ह्यांतील तापमान पाहण्याची खाली दिलेल्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव शोध

Maharashtra Tmin on 16 Jan
Jalgaon 10
Klp 16.9
Udgir 15
Satara 12.7
Nanded 15.4
Harnai 17.3
Jalna 14
Nashik 10.5
Aurangabad 10
Dahanu 13.2
Malegaon 13.8
Pune 10.8
Rtn 16
Slp 15.5
Parbhani 13
Matheran 13.8
Baramati 12.2
Osbad 14.4
Sangli 15.1

error: Content is protected !!