Weather Update : राज्यात ‘या’ भागासाठी आज हवामान खात्याकडून यलो अलर्ट; विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही भागात पावसाने उघडीप दिली आहे तर काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत पडलेला पाऊस पाहता राज्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी व त्यापेक्षा अधिक बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्याची आकडेवारी हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज विदर्भ आणि मराठवाडा मध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Weather Update) देण्यात आला आहे. हा अलर्ट बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा ,नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देण्यात आला असून राज्यामध्ये उर्वरित भागात साठी कोणताही अलर्ट आज जारी करण्यात आलेला नाहीये.

त्यामुळे उर्वरित भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे तर काही भागांमध्ये आज पाऊस उघडीत घेण्याची शक्यता आहे. बहुतांशी ठिकाणी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून देण्यात आलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!