Weather Update : मान्सून माघारीसाठी अनुकूल स्थिती; पहा आज कुठे कसा पाऊस ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात माध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस (Weather Update) कोसळत असून काही भागात ढगाळ हवामान आहे. दरम्यान आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी पालघर च्या किनारपट्टी भागात माध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान तज्ञ् के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. तर मागील २४ तासात मुंबई, ठाणे भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून आज या भागात ढगाळ हवामान आहे. राज्यातील काही ठिकाणी आज अधून मधून हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील.

हवामान स्थिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात नैऋत्य मान्सून वारे परतीच्या प्रवासाला (Weather Update) लागण्याची चिन्हे आहेत. पुढील २ दिवसात वायव्य भारतातील काही भागात नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

आज कुठे पाऊस ?

दरम्यान आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी गोवा आणि कोकण विभागात पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटसह पाऊस होईल अशीच स्थिती विदर्भातही होण्याची शक्यता आहे. अशी महिपती हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून देण्यात आली आहे.

error: Content is protected !!