Weather Update : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच ; पहा कुठे किती तापमान ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गुलाबी थंडी ओसरली असून उन्हाचा चटका दुपारच्या वेळेत वाढला आहे. दरम्यान आज दिवसभर राज्यात कोरडे (Weather Update) हवामान राहणार असून तापमानातील चढ -उतार कायम राहणार आहे. मागच्या २४ तासात राजस्थानातील चुरू देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्याचा विचार करता उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात ११ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. तर सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.२ अंश तापमान नोंदले गेले.

हवामान स्थिती

बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ (Weather Update) रविवारपर्यंत (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. वाऱ्यांच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही प्रणाली तीव्र होऊन तमिळनाडू, पद्दूचेरीच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत आहेत.

कुठे किती तापमान?(Weather Update)

गुरुवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.६ (११.९), जळगाव ३१.४ (१३.७), धुळे ३१ (११), कोल्हापूर ३१ (१६.८), महाबळेश्‍वर २६.७ (१२.८), नाशिक ३० (१३), निफाड २९.८ (११), सांगली ३२(१५.८), सातारा ३०.९ (१६.६), सोलापूर ३२.७ (१५.१), सांताक्रूझ ३५.२ (२०.४), डहाणू ३२.३ (१९.६), रत्नागिरी ३४.७ (२०.३), औरंगाबाद २९.६ (१०.८), नांदेड ३२.६ (१३.६), उस्मानाबाद ३१.२ (१५.२), परभणी ३०.२ (१२.६), अकोला ३१ (१४.२), अमरावती ३०.६ (१३.७), बुलडाणा ३०.४ (१४), ब्रह्मपुरी ३१.५ (१४.६), चंद्रपूर २८.४ (१४.६), गडचिरोली ३०.२ (१३.२), गोंदिया २८.८ (१२.४), नागपूर २९.४ (१३.२), वर्धा २९.९ (१३.८), यवतमाळ ३३ (१२).

error: Content is protected !!