कोकण तापले ! देशातील सर्वाधिक तापमान कोकणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील किमान तापमानात काही अंशी घट झाली आहे. दिवसाच्या तापमानात वाढ झाली आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका वाढला आहे. कोकणात गेले काही दिवस सातत्याने देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे. कोकणात कमाल तापमान पस्तिशी पार पोचले आहे. रत्नागिरी येथे देशातील सर्वाधिक रत्नागिरी देशातील उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यातही कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पार आहे.

हवामान स्थिती

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब प्रणाली ओसरत आहे. तर आग्नेय बंगालच्या उपसागरात विषूववृत्ताजवळ असलेले कमी दाब क्षेत्र वायव्येकडे सरकत आहे. उद्यापर्यंत ही प्रणाली श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. मागच्या २४ तासात हरियाणातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी ३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राज्यात विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील निचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

या राज्यात थंडीची लाट

हिमाचल प्रदेश
पंजाब
राजस्थान

कुठे किती तापमान ?

सोमवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३१.२ (१४.२), जळगाव – (१३.०), धुळे ३१.० (१२.४), कोल्हापूर ३१.५ (१८.८), महाबळेश्वर २६.४(१४.४), नाशिक ३०.३ (१४.९), निफाड ३१.४ (१३.०), सांगली ३२.२ (१७.०), सातारा ३१.०(१७.१), सोलापूर ३३.७ (१६.३), सांताक्रूझ ३५.२(२२.०), डहाणू ३१.१ (२१.५), रत्नागिरी ३५.६ (२३.९), औरंगाबाद ३१.० (१२.६), नांदेड ३०.८ (१४.०), परभणी ३०.८ (१३.५), अकोला ३२.८ (१५.९), अमरावती ३१.४ (१३.७), बुलढाणा २९.८ (१४.०), ब्रह्मपूरी ३१.६ (१३.४), चंद्रपूर २८.८ (१४.२), गडचिरोली २९.६(१२.६), गोंदिया ३०.५(१०.६), नागपूर २९.२ (११.४), वर्धा २९.२(१२.८), यवतमाळ २८.० (१०.५).

error: Content is protected !!