Weather Update : काही भागात पावसाचा जोर कमी; मात्र कोकण,विदर्भात जोरदार बरसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसतो आहे. भारतीय हवामान खात्याच्या GFS मॉडेलनुसार कोकणात व घाट भागात काही ठिकाणी येत्या 3,4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. तर विदर्भात देखील पुढचे 2 दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या.पायथ्याकडे सरकले आहे. पूर्वेकडील टोक आज (ता. २०) दक्षिणेकडे येण्याचे संकेत आहेत. पाकिस्तान आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र (Weather Update) कायम आहे. त्याला समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे वादळी प्रणालीत (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले आहे. ओडिशातील बालासोरपासून २००, दिघापासून १४० किलोमीटर पूर्वेकडे तर पश्चिम बंगालमधील सागर बेटांपासून १०० किलोमीटर आग्नेयेकडे या प्रणालीचे केंद्र आहे. ओडिशातील बालासोर आणि पश्चिम बंगालमधील सागर बेटांजवळ ही प्रणाली जमिनीवर येणार आहे. पुढे ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत. जमिनीवर येताच या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरणार आहे.

आज कुठे बरसणार पाऊस ?

कोकण आणि गोवा विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याच्या पुणे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!