Weather Update : महाराष्ट्र थंडगार…! पहा तुमच्या भागात किती घसरलाय तापमानाचा पारा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसात राज्यात गारठा वाढला (Weather Update) असून राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. उत्तरेकडील येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १० अंशांचा खाली घसरला आहे. पुणे, धुळे, निफाड, जळगाव, यवतमाळ या भागात थंडीची लाट आली आहे. दरम्यान मागील २४ तासात उत्तर महाराष्ट्रात धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ७ अंश, तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान स्थिती ?

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे (Weather Update) क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही तीव्र कमी दाब प्रणाली (डिप्रेशन) कराईकलपासून ६३० किलोमीटर पूर्वेकडे तर चन्नईपासून ६७० किलोमीटर आग्नेयेकडे होती. वायेव्यकडे सरकणारी ही प्रणाली उद्यापर्यंत (ता. २२) तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

धुळे आणि निफाडसह, जळगाव, पुणे आणि यवतमाळ येथे किमान तापमानाचा पारा १० अंश किंवा त्यापेक्षा अधिक घसरला असून, किमान तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्याने थंडीची लाट आली आहे. आज (ता. २१) अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज राज्यात दिवसभर हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

कुठे किती तापमान ? (Weather Update)

रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे २८.१ (९.७)
जळगाव ३०.० (८.५)
धुळे २९.० (७)
कोल्हापूर २९.६ (१५.२)
महाबळेश्वर २४.१(१०.६)
मालेगाव – (१८)
नाशिक २७.९ (९.८)
निफाड २९.४ (७.४)
सांगली ३०.२(१३.३)
सातारा २८.१(१२.६)
सोलापूर ३१ (१४.६)
सांताक्रूझ ३३.३(१९.८)
डहाणू ३१.८ (१७)
रत्नागिरी ३३.४ (१९.७)
औरंगाबाद २८.५ (११.१)
नांदेड २९.२ (१४.४)
परभणी – (११.५)
अकोला ३०.८ (१२.८)
अमरावती ३० (११.७)
बुलडाणा २८.६ (१३)
ब्रह्मपुरी २९.८ (१३.१)
चंद्रपूर २८ (१३.२)
गडचिरोली २८(१२.६)
गोंदिया २८.२(१०.४)
नागपूर २८.७ (११.४)
वर्धा २८ (१२.४)
वाशीम – (१३)
यवतमाळ २९.५ (१०).

error: Content is protected !!