Weather Update : कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसणार ; पहा तुमच्या भागात कशी असेल स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडत आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान आज (२२) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यताआहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिमेकडील टोक हिमालय पर्वताच्या पायथ्याकडे कायम आहे. तर पूर्व टोक बरेली, कानपूर, तीव्र कमी दाबाचे क्षेत्र, मध्य प्रदेश, दिघा ते आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. त्यामुळे मध्य भारतात ढगांची दाटी असून, पाऊस सुरू आहे. वायव्य झारखंड आणि आग्नेय मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी (Weather Update) होत आहे. वायव्येकडे सरकणाऱ्या या प्रणालीचे आज ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतर होणार आहे. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे.

घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरूच असून, पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित राज्यात पावसाने उघडीप दिली असून, ऊन सावल्यांच्या खेळात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. आज (ता. २२) कोकणासह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या भागाला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!