Weather Update : राज्यात आज मुख्यतः पावसाची उघडीप मात्र ‘या’ भागाला यलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे तर काही भागात मात्र हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या सारी बरसत आहेत.दरम्यान आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाची शक्यताआहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनने वायव्य (Weather Update) भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. गुरूवारी (ता. २२) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, या भागात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

दरम्यान आज दिनांक २३ रोजी हवामान (Weather Update) खात्याकडून बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागाला यलो अलर्ट दिला आहे.

 

 

 

error: Content is protected !!