Weather Update : राज्यात पावसाला पोषक वातावरण; ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीकडून अलर्ट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये थंडी अचानक कमी झाली असून, कमाल तापमानातही (Weather Update) काहीशी घट झाली आहे. अशातच आता राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, आज आणि उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तर शनिवारपासून (ता.24) पुढील 27 तारखेपर्यंत विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (Weather Update) (आयएमडी) व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना इशारा? (Weather Update Today 23 Feb 2024)

हवामान विभागाच्या (Weather Update) अंदाजानुसार, पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील प्रामुख्याने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसह मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असून, मुंबई आणि कोकण पट्ट्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. 10 ते 17 फेब्रुवारीदरम्यान जवळपास आठवडाभर विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

कमाल तापमानात घसरण

दरम्यान, राज्यातील किमान तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून, मागील दोन ते तीन दिवस 10 अंशाहून खाली घसरलेले धुळे येथील निच्चांकी किमान तापमान 12.4 अंशांपर्यंत वाढलेले आहे. तर सोलापूर येथे राज्यातील सर्वाधिक असलेल्या कमाल तापमानात घट होऊन, ते 36 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. याशिवाय सोलापूर व्यतिरिक्त मागील 24 तासांमध्ये केवळ मालेगाव (नाशिक), नागपूर, वर्धा या भागांमध्ये 35 अंशांहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. अर्थात राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात घट नोंदवली गेली आहे.

15 राज्यांमध्ये पावसाचे वातावरण

महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झालेले असतानाच उत्तरेकडील राज्यांमधील पावसाचे वातावरण कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 25 फेब्रुवारीपर्यंत देशातील 15 राज्यांमधील अनेक भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर पंजाब, उत्तर हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, केरळ, झारखंडच्या काही भागासह ईशान्य राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

error: Content is protected !!