Weather Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात ढगाळ हवामान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात बहुतांशी भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोरही कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटकाआणि उकाड्यात वाढ झाली आहे. पाऊस कमी झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनने (Monsoon) वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (२०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. परतीच्या प्रवासात (Weather Update) कोणतीही वाटचाल न झाल्याने शुक्रवारी (ता. २३) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरापासून या प्रणाली पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

आज (२४) पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची मुख्यतः उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.राज्यात ढगाळ (Weather Update) वातावरण अनुभवायला मिळत आहे. मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

‘या’ भागला यलो अलर्ट

आज हवामान खात्याकडून अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागाला यलो अलर्ट दिला असून या भागात विजांसह पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

error: Content is protected !!