Weather Update : पुढील 6 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

0
5
Weather Update Today 25 Dec 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये थंडी पडली आहे. तर काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता (Weather Update) निर्माण झाली आहे. 2024 या नववर्षाच्या सुरुवातीला राजधानी दिल्ली, मध्य भारतासह उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हा पाऊस प्रामुख्याने 30 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत होऊ शकतो. असा अंदाज भारतीय भारतीय हवामानशास्र (Weather Update) विभागाने (IMD) व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 6 दिवस तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता (Weather Update) आहे. 27 आणि 28 डिसेंबर रोजी तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम होऊ शकतो. दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, पंजाब, हरियाणामध्येही या काळात पावसाची शक्यता आहे. ख्रिसमस आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्या जसजशा जवळ येत आहेत. तसतसे दिल्लीतील तापमानात घसरण होऊन पावसास अनुकूल वातावरण तयार होत आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

राज्यात काय स्थिती? (Weather Update Today 25 Dec 2023)

महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. राज्यात गारठा कायम असून, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी तापमानाचा पारा दहा अंशांखाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये बदलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात किमान तापमानात वाढ होणार असल्याने, गारठा काही अंशी कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, निफाड येथील गहू संशोधन केंद्र, गडचिरोली येथे 10 अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. आजपासून (ता. 25) राज्याच्या किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

प्रमुख ठिकाणांचे तापमान

राज्यातील काही ठिकाणांचे तापमान (किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 11.3, धुळे 8.5, जळगाव 12.6, कोल्हापूर 16.3, महाबळेश्वर 15, नाशिक 13.6, निफाड 9.1, सांगली 14.2, सातारा 13.4, सोलापूर 15.9, सांताक्रूझ 18.9, डहाणू 18.8, रत्नागिरी 20.5, छत्रपती संभाजीनगर 11.8, नांदेड 15, परभणी 12.2, अकोला 13.3, अमरावती 13, बुलडाणा 14, ब्रह्मपुरी 13, चंद्रपूर 11.2, गडचिरोली 9.8, गोंदिया 12.2, नागपूर 13.2, वर्धा 13, वाशीम 12, यवतमाळ 12.2.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here