Weather Update : शेतीकामाचे करा व्यवस्थापन; पुढील 4-5 दिवस पावसाचा जोर कमी राहणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली असून अधून मधून हलक्या ते माध्यम स्वरूपाचा पाऊस (Weather Update) काही भागात पडतो आहे. दरम्यान आजपासून काही दिवस अशीच उघडीप राज्यात राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ञ् के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४-५ दिवसात महाराष्ट्रात पावसाचा (Weather Update) जोर कमी राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो. १ सप्टेंबर पासून मात्र राज्यात हळूहळू पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापद्धतीने शेतीच्या कामाचे नियोजन करावे अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

दरम्यान आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी कोकण आणि गोवा भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात मात्र काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!