Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण; ‘या’ भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांशी भागात सध्या ढगाळ हवामान अनुभवायला मिळत आहे. तर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी काल बरसल्या. राज्यात पुन्हा एकदा पावसाला (Weather Update) पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार मुंबई, ठाणे, पालघर , पुणे नाशिक, अहमदनर, रायगड, उस्मानाबाद दक्षिण पूर्व विदर्भात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान स्थिती

उत्तर पंजाब आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून बिहार पर्यंत हवेचा कमी दाबाचा पूर्व पश्चिम पट्टा (Weather Update) सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) (Monsoon) वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. त्यानंतर परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल झालेली नसून, सोमवारी (ता. २६) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत वायव्य आणि मध्य भारताच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे.

‘या’ भागात मेघगर्जनेसह पाऊस

दरम्यान भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार  (Weather Update) आज दिनांक 27 रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय सोसाट्याचा वारा वाहण्याची ही शक्यता या भागासाठी वर्तवण्यात आली असून या भागाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

error: Content is protected !!