Weather Update: राज्यात ढगाळ हवामान; गारठा कमी, उकाड्यात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात लहरी हवामानाचा अनुभव (Weather Update ) सध्या होत आहे. हवेतील गारठा कमी झाला असून ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय दुपारच्या वेळेत उन्हाचा चटका देखील वाढला आहे. मागच्या २४ तासात राज्यातील दक्षिण कोकण, गोव्यासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसानेही हजेरी लावली.

हवामान स्थिती ?

आग्नेय अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार (Weather Update ) वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्पयुक्त वारे कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्याकडे येत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ हवामान झाले आहे. दक्षिण कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ हवामानामुळे उकाडा वाढण्याबरोबरच गारठा कमी झाला आहे. उत्तर अंदमान समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. दरम्यान उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी कायम असून, राजस्थानमधील चुरू येथे रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कुठे किती तापमान ?(Weather Update )

रविवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२ (१८.१)
जळगाव ३१.५ (१२.७)
धुळे ३१ (१०.५)
कोल्हापूर ३१.६ (२३.२)
महाबळेश्वर २५.४(१६.७)
नाशिक ३१.२ (१४.६)
निफाड ३१.१ (१३)
सांगली ३२.६(२२.४)
सातारा २७.६(२१.४)
सोलापूर ३४.५ (१९.४)
सांताक्रूझ ३४.३(२२.५)
डहाणू ३१.४ (२०.६)
रत्नागिरी ३४.३ (२३.३)
औरंगाबाद ३०.६ (१३)
नांदेड ३१.२ (१५.८)
उस्मानाबाद – (१६.९)
परभणी ३०.५ (१४.५)
अकोला ३२.४ (१४.९)
अमरावती ३०.२ (१२.७)
बुलडाणा २९.५ (१४.२)
ब्रह्मपुरी ३१.८ (१३.१)
चंद्रपूर २७.२ (१४)
गडचिरोली २९(१२.६)
गोंदिया २८.४(९.८)
नागपूर २९.४ (११.२)
वर्धा ३०.५(१२.४)
यवतमाळ ३१.० (११).

error: Content is protected !!