Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बहुतांनाश भागात पावसाने काल (Weather Update) उघडीप दिली. मात्र राज्यातील कोकण. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात बहुतनाशी ठिकाणी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान स्थिती

उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Weather Update) हवामान विभागाने वर्तविला आहे. मॉन्सूनची जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालिया पर्यंतची परतीची सीमा रविवारी (ता.२) कायम होती. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

‘या’ भागाला आज यलो अलर्ट

दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण विभागातील (Weather Update) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र भागातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला असून या भागात मेघगर्जनेसह,विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!