Weather Update : गेली थंडी कुणीकडे ? राज्यात तापमानात वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक भागात तापमानात (Weather Update) वाढ झाली असून गारठा कमी झाला आहे. दुपारी उन्हाचा चटका कायम आहे. तर कोकणात (२८) ला अवकाळी पावसाने हजेरी लावली असून राज्यातल्या अनेक भागात वातावरण ढगाळ होत आहे. मागच्या २४ तासात विदर्भातील गोंदिया, उत्तर महाराष्ट्रातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३३.७ अंश तापमान नोंदले गेले.

हवामान स्थिती ?

मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र (Weather Update) सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्येही थंडी कमी-अधिक होत आहे. राजस्थानातील चुरू येथे मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

कुठे किती तापमान ? (Weather Update)

मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३२.६ (१५), जळगाव – (१२.३), धुळे ३१ (१०.५), कोल्हापूर ३०.६ (२२.८), महाबळेश्वर २५.५(१५.६), नाशिक ३१.१ (१३), निफाड ३१.२ (११.२), सांगली ३०.६(१५), सातारा ३०.६(२१.८), सोलापूर ३२.४ (१८.५), सांताक्रूझ ३३.७(१७), डहाणू ३०.१ (१६.५), रत्नागिरी ३२ (२२.२), औरंगाबाद ३१ (१२.३), नांदेड – (१५.२), उस्मानाबाद – (१८), परभणी ३१.८ (१४.१), अकोला ३२.८ (१५.३), अमरावती ३३ (१२.३), बुलडाणा – (१५.२), ब्रह्मपुरी ३१.३ (१३.१), चंद्रपूर – (१४.२), गडचिरोली ३०(१३), गोंदिया २९.२(११.२), नागपूर ३०.२ (१२.३), वर्धा ३०.२(१३.४), यवतमाळ ३१.५ (१५).

error: Content is protected !!