Weather Update : राज्यातील अनेक भागात पावसाचे पुनरागमन; आज ‘या’ भागात विजांसह पावसाची हजेरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून राज्यात ओढ दिलेल्या पावसाने (Weather Update )पुन्हा एकदा अनेक भागात पुनरागमन केले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक ठिकाणी उष्णतेमध्ये वाढ झाली होती. मात्र मंगळवारी संध्याकाळी ४ वाजल्यानंतर पुण्यासह राज्यातल्या अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

दरम्यान आज दिनांक ३१ ऑगस्ट रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान स्थिती

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे (Weather Update )कायम आहे. अंतर्गत तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे.

आज ‘या’ भागात विजांसह पावसाची शक्यता

रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर,औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागासाठी आज हवामान खात्याकडून यलो (Weather Update ) अलर्ट देण्यात आला असून या भागात आज विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Comment

error: Content is protected !!