Weather Update : राज्यात बहुतांशी पावसाची उघडीप; ‘या’ भागात मात्र पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढला (Weather Update) आहे. यातच पावसाला पोषक वातावरण असल्याने आज (५) विदर्भ, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, उन्हाचा चटका, उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

हवामान स्थिती

उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतच्या भागातून मॉन्सून (Weather Update) परतला असून, परतीची ही सीमा मंगळवारी (ता. ४) कायम होती. पश्‍चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून वायव्य उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक हवामान आहे.

तापमानाचा पारा वाढला

तापमानात वाढ होत असल्याने ऑक्टोबर हीटचा चटका जाणवण्याची (Weather Update) शक्यता आहे. आज (ता. ५) विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात उन्हाचा चटका वाढला आहे. तर अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा ३० ते ३६ अंशांदरम्यान आहे.

 

 

error: Content is protected !!