Weather Update : राज्यात पावसाच्या हलक्या सरी, पहा कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशात हवामानातील बदलामुळे (Weather Update) राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा (Marathwada) अन विदर्भाच्या काही भागात गुरुवारी हलक्या सरींची नोंद झाली आहे. रोजचे तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. इथे पुढील पाच दिवसांचा अतिशय अचूक असा हवामान अंदाज सांगितला जातो. यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.

आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भात तयार झालेल्या प्रणालीमुळे दोन दिवस दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे असे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आज उस्मानाबाद (Osmanabad) येथे राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद येथे शुक्रवारी १०.३ अंश सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले. तर पुणे, सातारा १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यातील आजचे तापमान खालीलप्रमाणे (Maharashtra Tmin , 6 Jan 2023) –
Slp 19.8
Nanded 17.2
Klp 18.3
Nashik 16.2
Parbhani 16.5
Rtn 19.7
Pune 15.4
Sangli 18.4
Dahanu 19
Udgir 18.2
MWR 13.9
Satara 15
Harnai 21.7
Baramati 15.4
Osbad 10.3
Jalgaon 15.2
Matheran 18
Aurangabad 12.4
Jalna 14

error: Content is protected !!