Friday, January 27, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Weather Update : मान्सूनच्या परतीला होणार उशीर ! आज राज्यातल्या 25 हून अधिक जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 6, 2022
in हवामान
Heavy Rain
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात काल विजांच्या कडकडाटासह पावसाने (Weather Update) हजेरी लावली. अनेक जण हा परतीचा पाऊस असल्याचे समजत आहेत. मात्र हा परतीचा पाऊस नाही यंदाच्या वर्षी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा उशीर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

5 Sept:
🔸पुढील 3,4 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
🔸5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🔸गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
– IMD pic.twitter.com/xeM0SZj6x3

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 5, 2022

परतीच्या पावसाला उशीर होणार

येत्या आठवड्यात आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची प्रणाली निर्माण (Weather Update) होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला उशीर होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रानंतर आणखी एका कमी दबाच्या क्षेत्राचा असा अंदाज वर्तवला जात आहे असं हवामान विभाग पुणे येथील प्रमुख के . एस. होसाळीकर यांनी सांगितला आहे. जेव्हा अशा क्षेत्राची शक्यता असते तेव्हा परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवला जात नाही. या दोन्ही प्रणालीमुळे यंदाच्या परतीच्या पावसाला सरासरी तारखे पेक्षा उशिरा सुरुवात होऊ शकते असंही त्यांनी सांगितले आहे. साधारणतः 17 सप्टेंबर ही देशातून मान्सूनच्या माघारी फिरण्याची तारीख असून राज्यातून पाच ऑक्टोबरला मान्सून परत फिरण्याचा प्रवास सुरू होतो. पुढील आठवड्याच्या अखेरीस निर्माण होणाऱ्या प्रणालीमुळे राज्यातील पावसामध्ये वाढ होऊ शकते दक्षिण कोकणात याचा प्रभाव अधिक असू शकतो अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे

पुढील दिवस पावसाचे

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे तीन-चार दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या किंवा मध्यम गडगडाटासह पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे पाचव्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

आज ‘या’ भागाला यलो अलर्ट

दरम्यान आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी राज्यातल्या जवळपास 26 जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस (Weather Update) होण्याची शक्यता हवामान विभागातून वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांमध्ये विजन सह पाऊस होण्याची शक्यता आहे या भागाला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि गडचिरोली या भागांचा समावेश आहे

Tags: Latest Weather update MaharashtraMonsoon 2022RainRain Todayweather update
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group