Weather Update : जाताजाता दाणादाण ! आजही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सून (Monsoon) परतीच्या प्रवासाला लागला असताना देखील राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुण्यासह काल(६) राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Wether Update)  हजेरी लावली. त्यामुळे संध्याकाळनंतर अनेकांची धांदल उडाली. शिवाय आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण असून आज देखील राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. परतीच्या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

हवामान स्थिती ?

उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम, भारूचपर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला असून, परतीची ही सीमा गुरुवारी (ता. ७) कायम होती. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीपासून तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय (Wether Update) आहे. वरील वातावरणीय प्रणाली पोषक ठरल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. ७) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

आज या भागाला यलो अलर्ट

दरम्यान आज हवामान खात्याने वर्तवलेल्या (Wether Update) अंदाजानुसार कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाडातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर. विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. या भागात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता असून या भागाला आज यलो अलर्ट दिला आहे.

 

 

error: Content is protected !!