Weather Update Today : सध्या पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. आहे मात्र काही जिल्ह्यांमध्ये अजूनही म्हणावा असा पाऊस झाला नाही त्यामुळे तेथील नागरिक चिंतेत आहेत. आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होईल का? अशी लोकांमध्ये भीती आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला नाही. नदी नाले देखील कोरडे आहेत त्यामुळे तेथील शेतकऱ्यांवर देखील मोठे संकट आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर कोकणात तुरळकी ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणासह ऊन सावल्यांचा खेळ दिसेल तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
हलक्या सरी बरसण्याची शक्यता (Weather Update Today)
ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस दडी मारेल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला होता तो अंदाज खरा ठरताना दिसतोय. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाच्या फक्त हलक्या सरी बसत आहेत. राज्यात पावसाने उघडीप दिली असून ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळात हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज कोकणातील पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान अंदाज पाहणे झाले सोपे
तुम्हाला जर दररोजच्या दररोज हवामान अंदाज पाहायचा असेल तर प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करावे लागेल. हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर यामध्ये तुम्ही एकदम अचूकपणे हवामान अंदाज पाहू शकता. हे ॲप खास शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे. यामध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व गोष्टींची माहिती अगदी अचूक आणि सविस्तरपणे मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच Hello Krushi हे ॲप इन्स्टॉल करा
मान्सूनचा आस पंजाबच्या अमृतसरपासून यमुनानगर, गोरखपुर, पटना, बरेली, मालदा ते मणिपूर पर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे राहणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकरी चिंतेत
एकीकडे काही ठिकाणी राज्यात पावसाने थैमान घातले असले तरी अजूनही अशी काही जिल्हे अशे आहेत त्या ठिकाणी अद्यापही म्हणावा असा पाऊस झाला नाही. जो थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र जर पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाला पाणी कुठून द्यायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहील त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी नदी नाले देखील कोरडे आहेत.